दुर्दैवी सत्य
दुर्दैवी सत्य नमस्कार मित्रांनो सगळे मजेत ना. आजच्या समाजातले एक दुर्दैवी सत्य मी तुमच्यासमोर आणू इच्छितो. सहज कधी मार्केटला जात असताना सकाळी सकाळी जेवढी गर्दी वाईन शॉपी आणि बिअर शॉपी वर असते ती पाहून आश्चर्य वाटते. काही लोक जगण्यासाठी पितात की काय असं वाटतं. मागील सहा महिने लोक डाऊन मध्ये जे आपण चित्र पाहिले ते खूप विचित्र होते या कोरोना रोगा च्या, काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी गर्दी केली होती एक उदाहरण आपल्यासमोर आहे. तुम्हाला माहित आहे का कधी तुम्ही निरीक्षण करा जेवढी गर्दी वाईन शॉप वर असते त्यापेक्षा कमी प्रमाणात कमी गर्दी मेडिकल स्टोअर असते. याचा अर्थ असा नाही की, व्यवसायिकदृष्ट पाहिलं गेलं तर मेडिकल स्टोअर्स मधिल वस्तू पेक्षा दारू जास्त प्रमाणात विकली जाते. दारूने काही आजार बरे होत नाही, पण सगळ्या आजाराचे कारण दारू आहे. ज्याप्रमाणे लोक दारूपायी संसाराचे वाटोळे करतात. पण हे सर्वसामान्य लोकांना समजत नाही. भरपूर साऱ्या कीर्तनकारांनी यावरती भाष्य केले आहे पण समाजामध्ये काही बदल होत नाही. योग्य वाटले तर यावर विचार करा आणि मला प्रतिसाद द्या.
Good Thinking 👌👌👌👌👌 am with you.
ReplyDeleteThanks
Delete